Ad will apear here
Next
एकभाषकपणा – अमेरिकेस ठेच, इतरांसाठी शहाणपणा


शीतयुद्ध संपल्यानंतर जग एकध्रुवीय झाले आणि अन्य भाषा शिकण्याची प्रवृत्ती कमी झाली. म्हणूनच एकभाषकपणा ही अमेरिकेची समस्या बनून राहिली आहे. जगात अन्य भाषाही आहेत आणि त्यांचे कौशल्य आत्मसात करावे, हे भान गेल्यामुळे अमेरिकेपुढे समस्या उभी राहिली आहे. त्यापासून आपणही धडा घ्यायला हवा...
.........
दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील एक गोष्ट सांगतात. जर्मनीने फ्रान्सचा ताबा घेतला होता. त्याच्याविरोधात इंग्लंड आणि अमेरिकेच्या फौजा जर्मनीच्या विरोधात उतरल्या आणि त्यांनी फ्रान्सची मुक्ती केली. त्यापूर्वी अमेरिकेचा एक तळ फ्रान्समध्ये होता. बेल्जियममध्ये १९४४च्या सुमारास बल्ज येथे झालेल्या लढाईत अमेरिकन सैन्याची एक जीप पेट्रोल पंपावर चार सैनिकांसह थांबली. तिथे असलेल्या ‘जीआय’ना (अमेरिकी सैनिक) जीपमधील लोकांनी अत्यंत हळुवारपणे ‘पेट्रोल, प्लीज,’ असे सांगितले. पंपमधील सैनिक लगेच सावध झाले आणि त्यांनी विचारले, ‘मला सांगा, तुम्ही कोठे आहात हे तुम्हाला ठाऊक आहे का?’

त्या जीपमधील लोकांना लगेच धोक्याची जाणीव झाली. ते जर्मनीचे हेर होते. त्या जीपचा ड्रायव्हर असलेला जर्मन सैनिक घाबरला. त्याने लगेच आपले वाहन भरधाव सोडले; मात्र बर्फाच्या रस्त्यावरून त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ती जीप पुढे जाऊन आडवी झाली. हे अयशस्वी प्रकरण ‘ऑपरेशन ग्राइफ’ या नावाने ओळखले जाते. (या संदर्भातील ‘बॅटल ऑफ दी बल्ज’ या सिनेमाविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

अमेरिकी फौजांची पुढील योजना काय आहे याचा अदमास या जर्मन हेरांना काढायचा होता. तेथील सैनिकांशी बोलताना त्यांनी अमेरिकी उच्चार तर पूर्ण आत्मसात केले होते; मात्र त्यांच्या बोलण्यात जीपसाठी पेट्रोल पाहिजे हे वाक्य आले आणि ते अमेरिकी असल्याचा बनाव करत असल्याचे अमेरिकी सैनिकांना कळून आले. याचे कारण म्हणजे पेट्रोल, डिझेल इत्यादी इंधनांना अमेरिकी इंग्रजीत गॅस किंवा गॅसोलीन असा शब्द आहे. त्या हेरांनी मात्र पेट्रोल हा शब्द वापरल्यामुळे त्यांचे बिंग फुटले.

प्रत्येक देशाच्या भाषेमध्ये अशा खाचाखोचा असत्यात. त्या फक्त स्थानिक भाषकांना कळू शकतात. त्याचा बनाव करून जेव्हा बाहेरचे लोक ही भाषा वापरण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांचे पितळ उघडे पडते. त्या जर्मन सैनिकांसोबत तेच झाले. आता ७० वर्षांनंतर सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (सीआयए) या अमेरिकी गुप्तचर संस्थेने नुकत्याच केलेल्या एका गफलतीमुळे हे वास्तव पुन्हा अधोरेखित झाले.

रशियन भाषकांनी ‘सीआयए’मध्ये दाखल व्हावे व संस्थेसाठी काम करावे यासाठी ‘सीआयए’ने काही पोस्टर्स प्रकाशित केली होती. त्यामध्ये इंग्रजी वळणानुसार रशियन भाषा वापरल्यामुळे, तसेच फाँटमध्ये गडबड झाल्यामुळे ‘सीआयए’ची खिल्ली उडवण्यात आली. इंग्रजी आणि रशियन भाषेतील ही पोस्टर्स वॉशिंग्टन डीसीमधील सरकारी कार्यालये असलेल्या मुख्य भागात लावण्यात आली होती. 

रॉयटर्स वृत्तसंस्थेचे पत्रकार डेव्हिड ब्रुनस्टॉर्म यांनी सर्वांत आधी या पोस्टर्सची माहिती दिली. गंमत म्हणजे या पोस्टरवर फक्त भाषेची चूक केलेली नसून, त्याच्यावरील चित्रातही गफलत झाली आहे. या पोस्टरवर एका चिनी व्यक्तीचा चेहरा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे रशियन भाषा बोलणारी चिनी व्यक्ती ‘सीआयए’ला हवी आहे का, असा प्रश्नव अनेकांनी विचारला आहे.



अमेरिकेत अशा गफलती वारंवार होत आहेत आणि त्याला कारण म्हणजे अमेरिकेतील भाषेची समस्या. न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ११ सप्टेंबर २००१ रोजी हल्ला झाल्यानंतर अमेरिकेला सुरक्षेची चिंता भेडसावू लागली आणि अमेरिकेचे लक्ष पश्चिम आशियावर वळले. त्या वेळी अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि पश्चिम आशिया महत्त्वाचा असूनही, तेथील स्थानिक भाषा बोलण्यासाठी आवश्यक कौशल्ये असलेल्यांचा अभाव ‘सीआयए’ला अनेक वर्षे भेडसावत होता. आपल्याला हव्या असलेल्या भाषा त्वरित शिकवल्या जाऊ शकत नाहीत, याची जाणीव ‘सीआयए’सारख्या बलाढ्य संस्थेला त्या वेळी पहिल्यांदाच झाली होती. कारण तोपर्यंत रशियाशी शीतयुद्ध खेळत असलेल्या अमेरिकेने सर्व जोर रशियन आणि युरोपीयन भाषेवर दिला होता. त्यातही पूर्व जर्मनी हे पूर्व युरोपाचे आणि साम्यवादी जगाचे दार असल्यामुळे जर्मन भाषेला लाल गालिचा अंथरण्यात आला होता; मात्र शीतयुद्ध संपुष्टात आले आणि ती कौशल्ये मूल्यहीन झाली.

अरबी भाषकांच्या दहशतवादाची समस्या अमेरिकेसमोर उभी राहिली, तेव्हा या सामन्याचा मुकाबला कसा करावा, हेच त्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह होते. ‘भाषा हे आमच्यासाठी एक आव्हान असेल,’ असे गुप्तचर विभागाचे तत्कालीन संचालक जेम्स क्लॅपर यांनी अमेरिकी संसदेसमोर झालेल्या सुनावणीत म्हटले होते.

आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर रशियन हस्तकांचा अमेरिकेतील हस्तक्षेप त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरला आहे. ट्रम्प यांच्या निवडीमागे रशियाने उभे केलेले पाठबळच कारणीभूत होते, हा अमेरिकेतील तज्ज्ञांना ठाम विश्वास आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेला पुन्हा मोठ्या प्रमाणावर रशियन भाषकांची गरज आहे. अगदी ते निवडून आल्यावरही हा संशय फिटलेला नाही. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रभावित करायचे असेल, तर नागरिकांनी रशियन भाषा शिकावी, असे वक्तव्य हार्वर्ड विद्यापीठाच्या केनेडी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट येथे भाषण करताना माजी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी केले होते. केरी यांच्या या टीकेला रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने लगेच प्रत्युत्तर दिले होती. केरी यांनी व्लादिमीर मायाकोव्हिस्की यांच्या कविता वाचाव्यात, असे या मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाकारोव्हा म्हणाल्या होत्या.

ही रशियन डोकेदुखी दूर करण्याच्या घाईगडबडीत अमेरिकेसारख्या महाशक्तीकडून अशा चुका होत आहेत. ‘सीआयए’सारखी गुप्तचर यंत्रणा भाषा कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जाहीरपणे उघड करत नाहीत. त्यातही इतक्या उघडपणे जाहिरात देऊन तर सहसा भरती केली जात नाही. तरीही अमेरिकेने हा मार्ग पत्करला यातूनच तिची निकड लक्षात येते.

कुठल्याही समाजाच्या दृष्टीने भाषा ही एकोपा निर्माण करणारी पहिली कडी असते. एखाद्या व्यक्तीला धर्माचे सोंग करता येते; पण भाषेचे सोंग करता येत नाही. हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक मार्क शेल यांनी ‘लँग्वेज वॉर्स’ या शीर्षकाचा निबंध याच विषयावर लिहिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की एखादा अल्बानियन माणूस सर्ब (सर्बियन) म्हणून खपू शकतो. त्याचप्रमाणे ज्यू माणूस ख्रिस्ती असल्याचे नाटक करू शकतो; पण दोन व्यक्तींची भाषा वेगळी असेल, तर त्यांची भाषा एक असल्याचे सोंग करता येत नाही.

अमेरिकेचे नेमके हेच झाले आहे. पूर्वी ‘सीआयए’ची फॉरीन लँग्वेज इन्स्टिट्यूट ही स्वतंत्र शाखा होती; मात्र शीतयुद्ध संपल्यानंतर जग एकध्रुवीय झाले आणि अन्य भाषा शिकण्याची प्रवृत्ती कमी झाली. म्हणूनच एकभाषकपणा ही अमेरिकेची समस्या बनून राहिली आहे. जगात अन्य भाषाही आहेत आणि त्यांचे कौशल्य आत्मसात करावे, हे भान गेल्यामुळे अमेरिकेपुढे ही समस्या उभी राहिली आहे. त्यापासून आपणही धडा घ्यायला हवा. अमेरिकेला जी ठेच लागत आहे, त्यापासून इतरांनी शहाणे व्हायला हवे.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZZPBZ
 Knowledge of other languages is an asset . It can help in working life .
It widens scope for employment , opportunities for work in other
Regions . It opens door to knowledge in languages .
 There is a genuine conflict . One learns best when Mothertongue is
the medium . This is true . But then , at the higher level of learning ,
knowledge of a different language is necessary . In certain subjects ,
almost mandatory .
Similar Posts
जो यंत्रावर विसंबला, त्याचा ‘प्रचार’ बुडाला...! गुगल ट्रान्स्लेट सेवा असो किंवा अन्य कोणतीही यंत्राधारित सेवा असो, ती आपल्याला भाषांतर करण्यासाठी बहुमोल मदत करू शकते; मात्र त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहता येणार नाही. मूळ भाषकांपर्यंत जायचे असेल, तर त्याला मानवी स्पर्श मिळणे अत्यावश्यक आहे, हा धडा अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीला उभ्या राहिलेल्या उमेदवारांच्या गफलतीतून मिळाला आहे
स्वल्पविराम... मुक्त पत्रकार आणि अनुवादक देविदास देशपांडे यांचे भाषाविषयक सदर दर सोमवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होत होते. त्याचा समारोप करणारा हा लेख...
भाषांच्या जंजाळात अडकलेला फेसबुकचा ‘स्वच्छाग्रह’ द्वेषयुक्त साहित्य आणि अन्य आक्षेपार्ह मजकुराच्या विरोधात फेसबुकने जोरदार अभियान सुरू केले आहे; मात्र आता या अभियानाला भाषांमुळे खीळ बसत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या स्मार्टफोनमुळे फेसबुकला अनेक नवे वापरकर्ते मिळाले खरे; मात्र त्यातून फेसबुकवरील साहित्यात नवनवीन भाषांची भर पडत आहे. यातूनच मजकुराची
इंग्रजी – राणीची, व्यापाऱ्यांची आणि राजपुत्राची! फ्रान्सचा मानबिंदू असलेले नोत्रे-दाम चर्च गेल्या आठवड्यात जळाले, तेव्हा आपल्या या शेजारी देशाला सहानुभूती म्हणून प्रिन्स चार्ल्स यांनी एक पत्र लिहिले होते. या पत्रात अनेक शब्दांची स्पेलिंग अमेरिकी वळणाने लिहिल्याचे हे पत्र जाहीर झाल्यावर लक्षात आले. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला... या घटनेच्या निमित्ताने इंग्रजी भाषेबद्दलची चर्चा करणारा लेख

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language